महाराष्ट्र

102 आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं; धनंजय मुंडेंचा फडणवीसांना टोला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

17 Sept :- 102 आमदार असूनही भाजपला उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं. मग, नवं सरकार आणून भाजपचा फायदा काय झाला?, असा सवाल धनंजय मुंडेंनी केला. तसेच, उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिकही नसत, असा टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

आज बीडमध्ये जाहीर सभेत धनंजय मुंडेंनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार टोलेबाजी केली. मुंडे म्हणाले, राज्यात कोणतीही गंभीर परिस्थिती नसताना, नागरिकांची सर्व कामे होत असताना मविआ सरकार पाडण्यात आले. एवढे करुनही सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपला उपमुख्यमंत्रीपद घ्याव लागलं. त्यात ते पद संवैधानिकही नाही. त्यामुळे हे नवं सरकार आणून भाजपने काही मिळवल नाही तर उलट गमावल.

मुंडे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार कुणाला घाबरत असेल तर ते विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना. अजित पवारांची या सरकारला धास्ती आहे. मात्र, हे सरकार आता फारच बेशिस्त वागायला लागले आहे. अजित पवारांची शिस्त काय असते, हे आम्हाला माहिती आहे. तेच या सरकारला शिस्तीत आणतील.

मुंडे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारला केवळ 18 मंत्रिपदे जाहीर करायला दोन महिने लागले. त्यातही कित्येक मंत्र्यांना आपल्याला दिलेले खाते न आवडल्यामुळे त्यांनी अद्याप पदभारच स्वीकारलेला नाही. मग काय फक्त झेंडावंदनासाठी त्यांना मंत्रिपदे दिली. दोन महिन्यानंतरही अजून जिल्ह्यांना पालकमंत्री नाही. पालकमंत्र्यांची घोषणा कधी होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास कधी होणार? याचा हिशोब आता जनतेनेच लावावा.

मुंडे म्हणाले, मविआच्या काळात बीडमध्ये कोट्यवधींची कामे करण्यात आली. जिल्हा विकास निधीत पहिल्या वर्षी 50 कोटी वाढवून दिले. त्यानंतर 40 कोटी वाढवून दिले. त्यामुळे बीड, अंबाजोगाई येथे एक हजार खाटांचे हॉस्पिटल करु शकलो. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने बीडला अद्याप फुटकी कवडीही दिली नाही. मविआ सरकारने दिलेल्या पैशातूनच आताही विकासकामे सुरू आहेत. मविआ काळात झालेल्या कामांचा आम्हाला अजूनही अभिमान वाटतो. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आता मंजूर झालेला निधीही स्थगित करुन या विकासकामांना खीळ घालण्याच काम करत आहे.