‘फॉक्सकॉन’वर ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, आम्ही खूप प्रयत्न केले…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
17 Sept :- वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या अपयशाचे खाप शिंदे-फडणवीस आमच्यावर फोडत आहेत. मात्र, आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात रहावे म्हणून खूप प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळतंय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. यावर ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर सगळेच नेतेमंडळी आपली प्रतिक्रिया देत होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यानंतर अखेर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फॉक्सकॉन आणण्यासाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केलेत. पण तो आता गुजरातला गेल्याने आत्ताचे सरकार आपल्या अपयशाचे खापर जाणिवपूर्वक मविआवर फोडत असल्याचे ठाकरे म्हणाले.
आज शिवसेनेची एक बैठक झाली असून, ही बैठक दसरा मेळावा आणि 21 तारखेला होणाऱ्या गटमेळाव्याच्या आयोजनासंदर्भात होती. त्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर भाष्य करत “अपयशाचं खापर आमच्यावर फोडत आहेत” असे म्हटले आहे.
शिंदे गटावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसेना फोडण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत, पण आधी त्यांनी शिवसेनेचा इतिहास जाणून घ्यावा, शिवसेनेंच्या पिढ्याचा अभ्यास करावा, आमची सहावी पिढी आता मैदानात उतरली आहे. माझ्यासमोर बसलेला शिवसैनिक हा धगधगत्या मशालीप्रमाणे मैदानात उतरला आहे.” अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे.
वेदांता-फॉक्सकॉनवर उद्धव ठाकरे म्हणाले की, “फॉक्सकॉन आणण्यासाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केलेत. पण तो आता गुजरातला गेल्याने आताचे सरकार आपल्या अपयशाचे खापर जाणिवपूर्वक मविआवर फोडत आहे.”