बीड

बीड; कोरोना वार्डात मृत्यू

बीड- बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन कक्षात आज सोमवारी सकाळी एका व्यक्तीच्या अचानक मृत्यूने खळबळ उडाली,मुंबईहून आलेल्या ३२ वर्षीय संशयित व्यक्तीचा २ स्वॅब घेण्यात आला होता मात्र २ वेळा अहवाल अनिर्णयीत राहिल्या कारणाने ह्या व्यक्तीचा तिसऱ्यांदा स्वॅब घेण्यात आला.रात्री या व्यक्तीचा स्वॅब घेतल्या नंतर या व्यक्तीचा पहाटे मृत्यू झाला.आरोग्य विभाग हैराण झाला आहे.या मृत व्यक्तीच्या अहवालाची प्रतीक्षा सर्वाना लागलेली आहे.
आष्टी तालुक्यातील मतकुळी येथील एक कुटुंब 31 मे रोजी गावाकडे मुंबई वरून आले,त्यावेळी त्यांची आरोग्य विभागाने तपासणी केली,तेव्हा सर्वांचे स्वॅब घेण्यात आले होते,पती,पत्नी अन मुलं यांपैकी तिघांचे स्वब निगेटिव्ह आले मात्र पतीचा स्वॅब दोनवेळा पाठवून देखील अनिर्णित आला होता,दरम्यान सोमवारी पहाटे या व्यक्तीचा मृत्यू झाला .