गोमुत्राने खैरेंचे डोके साफ करावे लागेल; संदीपान भुमरेंचा हल्लाबोल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
16 Sept :- उचलली जीभ अन लावली टाळूला. ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन प्रकल्पाशी माझा काही संबंध नाही, असे म्हणत रोजगार फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच गोमुत्राने रस्ते साफ करण्यापेक्षा खैरेंचे डोके साफ करावे लागणार आहे, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत खैरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
पुढे आपल्यावरील आरोपांवर बोलताना संदीपान भुमरे म्हणाले की, माझ्यावर लावण्यात आलेले आरोप साफ खोटे आहेत. अजून कुठलेही टेंडर झालेले नाही. माझे जावई असले तरी त्यांचे जुने रजिस्ट्रेशन आहे. ते माझ्या मुलीशी लग्न होण्याच्या आधीपासून कॉन्ट्रॅक्टर आहेत. माझा याच्याशी काही एक संबंध नाही. टेंडर हे ऑनलाइन असते. मी ते देऊ शकत नाही. यावर आता मी बोलणार नाही. पुरावे असतील तर दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
विरोधकांवर भुमरे यांनी यावेळी पलटवार केला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्यदिव्य सभा झाल्यापासून त्यांना भुमरेच दिसत आहेत. सभेच्या आधी माझ्यावर पैसे वाटल्याचे, चहा-नाश्ता ठेवला असे आरोप ठेवण्यात आले होते. हे काय आरोप आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला.
संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरेंवर यावेळी टीका केली. ते म्हणाले, ‘गोमुत्र शिंपडण्याचे काम खैरेंच्या म्हणण्यावर झाले. मला वाटते गोमुत्राने रस्ते साफ करण्यापेक्षा खैरेंचे डोके साफ करावे लागणार आहे. आता त्यांना याची गरज आहे. त्यांचे डोके सध्या काम करत नाहीय. पैठणची सभा झाल्यापासून त्यांच अस झालंय.
घरातील माणूस गेल्यानंतर गोमूत्र शिंपडतात. पैठण तालुक्यातील नागरिक इतके गेलेले आहेत का? अन् हा खैरे काय फार चांगला आहे का? त्यामुळे याचं डोकं गोमुत्राने साफ करावे लागणार आहे. आणि ते आम्हीच साफ करू. त्याशिवाय ते साफ होणार नाही. आणि चांगल्याप्रकारे काम करणार नाही’.