महाराष्ट्र

धडाकेबाज कारवाई! 92 किलो सोन्यासह तब्बल 330 किलो चांदी जप्त

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 Sept :- अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईतील झवेरी बाजारातचार छापे टाकले. यात सराफा व्यापाऱ्याकडून 92 किलो सोने आणि 330 किलो चांदी जप्त केली. ही कारवाई आज करण्यात आली, अशी माहिती इडीकडून देण्यात आली आहे. मेसर्स रक्षा बुलियन आणि मेसर्स क्लासिक मार्बल्सशी संबंधित ही छापेमारी होती. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन राबवले्. मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेडच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीचा या कारवाईचा संबंध आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.

8 मार्च 2018 रोजी मेसर्स पारेख अल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीने बँकांना फसवून 2296.58 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर विविध कंपन्यांच्या माध्यमातून लेअरिंग करून पैसे पाठवले होते. असुरक्षित कर्ज आणि गुंतवणूक प्रदान करण्याच्या, कर्ज घेण्यासंदर्भात कोणतेही करार झालेले नाहीत. यापूर्वी ईडीने 46.97 कोटी आणि 158.26 कोटी रुपये संलग्न केले आहेत.

झडतीदरम्यान परिसरात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. मेसर्स रक्षा बुलियनच्या खाजगी लॉकर्सची झडती आज घेतली गेली. ईडीच्या छापेमारीत योग्य नियमांचे पालन न करता व्यवहार केले जात होते. केवायसीचे पालन केले गेले नाही, आवारात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला नव्हता. आत आणि बाहेर कोणतेही रजिस्टर नव्हते असे दिसून आले.

लॉकर परिसराची झडती घेतली असता 761 लॉकर्स असल्याचे समोर आले आहेत. मेसर्स रक्षा बुलियन. लॉकरमध्ये 91.5 किलो सोने आणि 152 किलो चांदी सापडली. 2 लॉकरही ताब्यात घेण्यात आले असून यात अतिरिक्त 188 किलो चांदी जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 47.76 कोटी आहे. ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.