महाराष्ट्र

बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल; राजकीय आंदोलन प्रकरणी न्यायालयीन कोठडी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

14 Sept :- शिंदे गटाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांनी विविध राजकीय आंदोलनातील प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला होता.

आज गिरगाव न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार व महाविकास आघाडी सरकारमधील माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्द गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायलयाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यायालयाने कडू यांच्याविरोधात अजामीनापात्र वॉरंट बजावला होता.

बच्चू कडू आज न्यायालयासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जामीन अर्ज फेटाळत बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.