महाराष्ट्र

अजित पवार एकनाथ शिंदेच्या भेटीला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 Sept :- महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही. सध्याच्या घडामोडींवरुन भविष्यातल्या राजकीय घडामोडींचा अंदाज बांधणं कठीण आहे. पण महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यापासून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रचंड आक्रमक झाले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी आजही पत्रकार परिषद घेवून वेदांता कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला कशी गेली? असा सवाल करत राज्य सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील या मुद्द्यावरुन शिंदे सरकारवर निशाणा साधला. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशाप्रकारची टीका होत असताना महाराष्ट्रात वेगळ्या राजकीय भेटीगाठीदेखील होताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशिया दौऱ्यावर गेले असताना या भेटीगाठी होत आहेत. अर्थात या भेटीगाठींमध्ये काही महत्त्वाचे कारणं देखील असू शकतात. पण या भेटीगाठीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा आजचा टायमिंग वेगळा आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विदेश दौऱ्यावर गेले आहेत.

रशियात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचं अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्याच निमित्ताने फडणवीस रशिया दौऱ्यावर गेले आहेत. पण दुसरीकडे आज सह्याद्री अतिथीगृहात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.