मेडिकल मध्ये स्फोट डॉक्टर चा भाजून दुर्दैवी मृत्यू
गेवराई -मेडिकल मध्ये झालेल्या स्फोटात डॉक्टर चा भाजून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथे घडली .स्फोट नेमका कशाचा झाला,त्यामागील कारण काय याचा तपास पोलीस घेत आहेत.
गेवराई तालुक्यातील जायकवाडी वसाहत नजीक असलेल्या बागपिंपळगाव येथील डॉ.सुधाकर चोरमले यांचा तलवाडा फाटा येथे दवाखाना असून त्या लगत बेलगाव येथील मोरे यांचे मेडिकल आहे. तर गेल्या पंधरा दिवसापासून या दवाखाना व मेडिकलच्या बाजूला डॉ.औटे यांचे मानव कल्याण सेवाभावी संस्था संचलित साई बाबा स्वास्थ केंद्र कार्यरत झालेले आहे. मात्र रविवार दि.7 रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास या मेडिकलला आग लागली असून या आगीत बाजूला असलेल्या साई समर्थ दवाखान्याचे डॉ.सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचा जळून मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेला एक जण जखमी झाला असून या घटनेबाबत परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.