अजित पवार पुन्हा नाराज; राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून गेले निघून
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
11 Sept :- नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज दिल्लीत अधिवेशन पार पडले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलण्याची संधी अजित पवारांच्या आधी दिल्याने अजित पवार नाराज होऊन राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून निघून गेले. प्रफुल्ल पटेलांनी माईकवरून अजित पवारांना विनंती केली पण ते परतले नाही.
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गदारोळ केला. तेंव्हा प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या समारोपाच्या भाषणापूर्वी अजित पवार भाषण करतील असे आश्वासन कार्यक्रत्यांना दिले. मात्र, सुप्रिया सुळे समजूत काढायला गेले असतानाच शरद पवार यांनी समारोपाचे भाषण सुरू केले, यामुळे अजित पवारांना भाषण करायची संधी मिळाली नाही.
आजच्या अधिवेशनासाठी देशभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले होते. हे अधिवेशन काही महाराष्ट्रापुरते नव्हते, राष्ट्रीय अधिवेशन असल्याने महाराष्ट्रातील काही नेत्यांनी आपले मत मांडले. केरळमधील आणि लक्षद्वीप येथील खासदारांनी भाषण केले. राष्ट्रीय अधिवेशन असल्यामुळे मी भाषणाबद्दल काही बोललो नाही, असे मत अजित पवार यांनी यानंतर व्यक्त केले.
अजित पवार यांचा स्वभाव तडकाफडकी आहे. याचा अनुभव अनेकदा पक्षातील पदधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही येत असतो. अजित पवार राष्ट्रीय अधिवेशनातून दोनदा बाहेर पडल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांना उधान आले होते.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, तुम्ही आधीच अजित पवार, अजित पवार केले, ते किती वेळ बसलेले होते, तुमच्यामुळे ते लवकर बाहेर पडले असा बोलू आपण नंतर शरद पवारांच्या भाषणाच्या आधी अजित पवारांचे भाषण होईल असे विश्वास देताना