क्राईमबीड

परळीच्या नागपुरातील थरारक घटना

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

दि. ११ सप्टेंबर :- आपला भाऊ आईला त्रास देत असल्याने त्याला समजावून सांगण्यासाठी बहिण माहेरी नागापूर येथे गेली होती. तिच्या सोबत तिचा चार वर्षीय मुलगाही होता. रात्री बहिण-भावामध्ये वादावादी झाली. या वादातून मामाने चार वर्षीय भाच्याचा गळा चिरला. यात तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने परळी तालुक्यात एकच खळबळ उडाली. आरोपी मामाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सैनिक लक्ष्मण चिमणकर (वय 27, रा. नागापूर गायरान) हा आपल्या आईला त्रास देत असे. भावाला समजावण्यासाठी लाडेगाव येथील बहिण सुरेखा विकास करंजकर ही आपल्या चार वर्षाच्या कार्तिक नावाच्या मुलासह काल माहेरी आली होती. रात्री बहिणीने आपला भाऊ सैनिक चिमणकर याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र भाऊ-बहिणीसोबत वाद करू लागला. दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. या रागातून सैनिक याने पहाटे आपला भाचा कार्तिक विकास करंजकर याचा चाकुने गळा चिरला. या घटनेमुळे मुलगा ओरडत आईकडे आला. आईने त्यास अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल केले मात्र मुलाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारार्थ लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक नेहरकर यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.