महाराष्ट्र

संजय शिरसाटांचा ठाकरेंवर हल्लाबोल! म्हणाले, उद्या बलात्कार आणि खून…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Sept :- उद्या बलात्कार आणि खुन करणाऱ्यांच्या कबरी बांधल्या जातील. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. मागच्या सरकारचा जो चांगुलपणा होता. त्याचा आम्हाला त्रास होत होता. याच कारणामुळे आम्ही या सरकारमधून बाहेर पडलो. असा हल्लाबोल आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.

याकूब मेमन प्रकरणावरुन संजय शिरसाट यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले, नाहक अनेकांचे बळी घेतले त्याची कबर होणे हे महाराष्ट्रासाठी दुखद आहे. कालच याबाबत बातमी पाहिली. यामध्ये याकूब मेमनची कबर अक्षरशः संगमरवरीच्या दगडाने बांधली जात आहे. लोकांसमोर काय आदर्श ठेवणार आहोत आपण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आमची आणि आमच्या पक्षाची हीच भूमिका आहे की, हे जे काही बांधकाम सुरु आहे ते अत्यंत चुकीचे आहे. आणि ते व्हायला नको. भाजपने घेतलेल्या भूमिकेवर शिरसाट म्हणाले, भाजपने काय भूमिका घेतली यावर मी बोलणार नाही. पण आमची भूमिका निश्चित आहे की, ज्यांनी हे सर्व करण्यासाठी परवानगी दिली. त्यांची कठोर चौकशी करण्यात यावी.

मुख्यमंत्री अशा गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यांनी याची दखल सुद्धा घेतली असेल. कारवाईला सुरुवातही झाली असेल. शिंदे यांच्या कानावर एखादी गोष्ट गेली तर त्याचा निकाल लागतोच. पुढे आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रीया देणे योग्य नाही, असे म्हणत पेंग्विन सेना या शेलारांच्या वक्तव्याचे समर्थन करणे शिरसाटांनी टाळले.