महाराष्ट्र

गणरायाचे कसे करावे विसर्जन; जाणून घ्या वेळ आणि मुहूर्त!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Sept :- गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला गणेशोत्सव 10 दिवसांनंतर अनंत चतुर्दशीला संपतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जनही केले जाते. संपूर्ण देशात अनंत चतुर्दशीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. उद्या 9 सप्टेंबर रोजी शुक्रवारी अनंत चतुर्दशी असल्याने बाप्पाचे विसर्जनाचा मुहूर्त आणि वेळ काय आहे जाणून घ्या.

गणेश विसर्जनासाठी सर्व मुहूर्त शुभ मानले जातात. शुक्रवार 9 सप्टेंबर सूर्योदयापासून गणेश विसर्जन करता येणार आहे. सकाळचा मुहूर्त- शुक्रवारी, 06:03 ते सकाळी 10:44 पर्यंतचा विसर्जनाचा मुहूर्त शुभ आहे. त्यानंतरही विसर्जन करता येईल, असे अकोला पौरोहित्य संघाचे रवी कुमार पंडित यांनी सांगितले.

गणपती विसर्जन करताना कोणतीही पूजा करण्याची गरज नाही. विसर्जनाच्या वेळी गणपतीची योग्य पूजा करा, आरती करा आणि नंतर गणपती विसर्जन घरीच करणार असाल तर, परत गणेश आरती म्हणायची गरज नाही. आपण जर विहिरीवर नदीवर किंवा इतर ठिकाणी विसर्जन करणार असाल, तर तिथे पण गणपतीची आरती करा. योग्य पद्धतीने पूजा करा आणि प्रसाद वाटावा.

गणेश विसर्जन शुभ मुहूर्त
सकाळचा मुहूर्त – शुक्रवार सकाळी 06.03 ते 10.44 पर्यंत
दिवसाचा मुहूर्त – 12.18 ते 01.52 पर्यंत
सायंकाळचा मुहूर्त – 5.00 ते 06.34 पर्यंत
रात्रीचा मुहूर्त – 09.26 ते 10.52 पर्यंत
मध्य सत्राचा मुहूर्त – शुक्रवारी मध्यरात्री 12.18 ते शनिवारी सकाळी 04.47 पर्यंत

विसर्जन विधीमध्ये गणपतीची आरती करून उत्तर पूजा केली जाते. गणपतीवर अक्षता, फुले वाहिले जातात. त्यानंतर मूर्ती हलविली जाते. मूर्तीत प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्यात गणरायाचे वास्तव्य मानले जाते. ते उत्तर पूजेनंतर मूर्ती हलवेपर्यंतच असते. एवढ्या दिवस श्रध्देने मनोभावे पूजलेल्या या मूर्तीला नंतर पाण्यात विसर्जित केले जाते. गणपतीवर अक्षता टाकल्यानंतर आणि गणपतीची मूर्ती हलव्यानंतर गणपतीचे विसर्जन झालेले आहे. नंतर विसर्जनासाठी घरी, तलाव किंवा अन्य ठिकाणी मूर्ती नेता येते.

गणेश भक्तांनी घरी स्थापन केलेल्या शाडूमातीच्या अथवा पर्यावरणपुरक गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी होणार आहे. त्या गणेशभक्तांना घरीच पर्यावरण पूरक विसर्जनाकरिता कुंडाची गरज आहे. विसर्जन कुंडांबरोबर तुळशीचा रोपाचे वितरण अनेक संस्थाकडून करण्यात येणार आहे.