महाराष्ट्र

राज्यात आजपासून 14 पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 Sept :- राज्यात ७ ते १४ सप्टेंबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनावेळी प्रशासनासह भाविकांना काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, मंगळवारी मराठवाड्याला जोरदार पावसाने झोडपून काढले.

मुंबई, रत्नागिरी, रायगड, गोंंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.

दरम्यान, ३० सप्टेंबर राेजी संपणाऱ्या मान्सूनमध्ये परतीच्या पावसासाठी वातावरण अनुकूल होत आहे. राज्यात मंगळवारी विविध शहरांतील पर्जन्यमान : नाशिक १, परभणी २४, कुलाबा १६, सांगली २१, वेंगुर्ला ३, औरंगाबाद ५७, कोल्हापूर १८, पुणे १५, जालना २०.