महाराष्ट्र

ठाकरे गटाला तूर्तास दिलासा, सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत स्थगित

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 Sept :- राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आज पुढे ढकलली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे. सकाळी साडेदहा दरम्यान पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली. त्यानंतर शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी कोर्टात युक्तीवाद केला. निवडणूक आयोगाच्या सुनावणीवरील स्थगिती उठवण्यात यावी, यासह शिवसेनेने धनुष्यबाण गोठवावे आणि घटनापीठाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कौल यांनी केली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत पहिल्यांदाच घटनापीठाकडे सुनावणी घेण्यात आली. न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली. शिवसेना आमचीच असा दावा शिंदे-ठाकरे दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही हे प्रकरण प्रलंबित आहे.

मात्र घटनापीठाने दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला घेणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे, या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे गटाला दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत कुठलाही निर्णय 27 सप्टेंबरपर्यंत घेऊ नये असे कोर्टाने सांगितले आहे. अशात एकनाथ शिंदे गटाने केलेली विनंती कोर्टाकडून तूर्तास फेटाळण्यात आली. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना 23 सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली होती.