मराठवाडा

पोलीस आयुक्तालयात महिलेने स्वतःला पेटवून घेतले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Sept :- शेजाऱ्यांशी असलेल्या भांडणात नवरा माझी बाजू न घेता शेजाऱ्यांची बाजू घेऊन मला मारहान करतो. माझ्या माहेरच्यांना बोलू देत नाही. माझ्या मुला बाळांचा संभाळ करा असा विनंती अर्ज करून एका विवाहित महिलेने (औरंगाबाद) पोलीस आयुक्ताल्यातच स्वतःला जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला.

या घटनेत महिला गांभीररित्या भाजली असून तिच्यावर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविता दीपक काळे ( वय ३२, रा. मांडवा गाव, ता. गंगापूर) असे महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. सविता या गंगापूर येथील रहिवाशी आहेत. शेजारी राहणाऱ्या कुटुंबासोबत त्यांचा नेहमी वाद व्हायचं. मात्र वाद झाल्यावर पती शेजाऱ्यांची बाजू घेऊन तूच चुकीची आहेस, असं म्हणत मारहान करायचा. साततच्या मारहाणीला सविता कंटाळली होती. सविताच्या माहेरच्या नातलगांसोबत देखील वाद उकरून मारहाण केली होती. या प्रकरणी सविताने आज एक अर्ज पोलीस आयुक्तालयात दिला होता.

माझ्या मुलांचा सांभाळ करा. आता माझी जगण्याची इच्छा नाही, असं सविताने म्हटलं होतं. अर्ज देऊन सविता पोलीस आयुक्तालयात पायरीच्या थोड्या अंतरावर आली आणि तिथे थांबून आपल्या पिशवीत ठेवलेली डिझेलची बाटली काढली अन् स्वतःच्या अंगावर टाकून जाळून घेतलं.

उपस्थित पोलिसांनी पिण्याच्या पाण्याचे आर ओ जारमधील पाणी महिलेच्या अंगावर टाकले आणि आग नियंत्रणात आणली. सविताला तातडीने शासकीय घाटी रुग्णाल्यात दाखल करण्यात आलं. या घटनेत महिला सविता काळे ही गांभीररित्या जखमी झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.