बीड

कुंदाताई काळे यांचे पती श्यामसुंदर काळे यांचे निधन

बीड- येथील सामाजिक कार्यकर्त्या कुंदाताई काळे यांचे पती श्यामसुंदर काळे यांचे आज (दि. ७) रोजी सायंकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.अचानक त्रास सुरु झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले.विशेष म्हणजे आज कुंदा ताई काळे आणि श्याम सुंदर काळे यांच्या लग्नाचा नुकताच वाढदिवस झाला. श्यामसुंदर काळे यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.