आमिर खानने मागितली माफी; ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्याने मानधनही केले परत
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
1 Aug :- अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, परंतु आतापर्यंत या चित्रपटाने केवळ जवळपास 60 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाचे बजेट जवळपास 180 कोटी इतके होते. म्हणजेच हा चित्रपट आपला निर्मिती खर्चापेक्षा अर्धी कमाईदेखील करू शकला नाही. दरम्यान, आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसकडून एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. यात आमिर खानने हात जोडून प्रेक्षकांची माफी मागितल्याचा दावा केला जात आहे.
आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 27 सेकंदांच्या व्हिडिओत लिहिले आहे, ‘मिच्छामी दुक्कडम.. म्हणजेच क्षमा मागण्याचा पर्व. आपण सर्व मनुष्य आहोत आणि चुका प्रत्येकाकडून होतात. कधी शब्दाने, कधी कृतीने, कधी अनावधानाने, कधी रागाने, कधी चेष्टेने, कधी न बोलता… माझ्यामुळे कधी तुमचे मन दुखावले गेले असेल तर मी माफी मागतो. मिच्छामी दुक्कडम,’ असे या व्हिडिओत म्हटले गेले आहे.
आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाकडे प्रेक्षकांनी सपशेल पाठ फिरवली. सोशल मीडियावर #बॉयकॉट लाल सिंग चड्ढा ट्रेंड झाले होते. त्यानंतर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आमिरने आपल्या चाहत्यांची माफी मागितल्याचा दावा केला जातोय. पण व्हिडिओमध्ये ऐकू येणारा आवाज आमिरचा नाहीये.
180 कोटींमध्ये बनलेल्या लाल सिंह चड्ढाने भारतात 20 दिवसांत सुमारे 62.66 कोटींची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना कोट्यवधींचे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत आमिर खान हे नुकसान भरून काढण्यासाठी आपली फी परत करणार असल्याचे वृत्त आहे.
बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, निर्माते आणि वितरकांची परिस्थिती पाहता आमिरने लाल सिंग चड्ढासाठी मानधन घेणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. असे म्हटले जात होते की, जर आमिरने त्याची फी घेतली असती तर निर्मात्यांना 100 कोटींहून अधिक नुकसान झाले असते. अशा परिस्थितीत चित्रपट फ्लॉप झाल्याची जबाबदारी स्वीकारत आमिरने स्वत: पुढे येऊन मानधन घेणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निर्मात्यांना आता अल्प प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे.
बॉलीवूडचे तिन्ही खान चित्रपटांसाठी मोठी रक्कम घेत असतात. त्यामुळे फी न घेणे ही आमिरसाठी मोठी गोष्ट आहे. या अभिनेत्याने यापूर्वी कधीही चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्याचे मानधन परत केले नव्हते. 4 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपटही फ्लॉप झाला होता, मात्र त्यावेळी आमिरने त्याची फी घेतली होती. ही पहिलीच वेळ आहे की, आमिरने चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी घेत मानधन घेतले नाही.
लाल सिंग चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज झाला. एकूण 20 दिवसांत चित्रपट केवळ 60 कोटींची कमाई करू शकला, त्यामुळे चित्रपटाला एकूण 120 कोटींचे नुकसान झाले. चित्रपट फ्लॉप होण्याचे दुसरे कारण म्हणजे आमिर आणि करीनाबद्दल लोकांमध्ये असलेला द्वेष, ज्यामुळे हा चित्रपट बॉयकॉट ट्रेंडचा बळी ठरला.