भारत

सोनिया गांधींना मातृशोक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 Aug :- काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला माइनो यांचे शनिवारी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले. काँग्रेस पक्षाच्या संपर्क विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजीच सोनिया गांधी आजारी आईला भेटण्यासाठी इटलीला गेल्या होत्या. सध्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुलगी प्रियंका गांधी वढेरा फक्त इटलीत आहेत. सोनिया गांधी यांच्या आईच्या निधनावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर लिहिले – त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या दु:खाच्या काळात संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत.