महाराष्ट्र

दसरा मेळावा झाला तर, तो एकनाथ शिंदेंचा होईल ; नारायण राणे यांची टीका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 Aug :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या कर्तुत्वावर मुख्यमंत्री झाले आहेत. दसरा मेळावा झाला तर, तो एकनाथ शिंदेंचा होईल. असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी एकनाथ शिंदेंनी बोलावलं तर मी नक्की जाईन. शिंदेंच्या मंचावर जुने शिवसैनिक असतील, असेही त्यांनी म्हटले.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार हे पर्मनंट सरकार आहे. कंत्राटी सरकार गणरायाने खाली खेचले. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत अशाप्रकारे अपमानित होऊन कुणालाही मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागलेले नव्हते. उद्धव ठाकरे हे फक्त् तीन तास मंत्रालयात गेले. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला त्यांनी काय दिले, असा सवालही त्यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, आता तुम्हाला बोलणाचा, टीका करण्याचा अधिकार नाही. आता आपण गप्प बसावे, रिटायरमेन्ट मिळालेली आहे, आता घरी बसा. स्वतःच्या कर्तृत्वावर संरपंच होण्याची सुद्ध तुमची लायकी नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या नावामुळे तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळाले, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

ते म्हणाले की, महाराष्ट्रावरचे विघ्न दूर झाले आहे. गेली अडीच वर्ष महाराष्ट्रावर संकंट आले होते. पण आता ते नाहीय. हे सरकार चांगले काम करत आहेत. एकनाथ शिंदेच्या मागे लागू नका ते एकदिवस सगळे काढतील, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

शिवसेनेतल्या बंडानंतर आदित्य ठाकरे पायाला भिंगरी लागल्यासारखे राज्यभर दौरे करतायत. त्यांच्या या दौऱ्यावरही आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता नारायण राणे यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने टीव टीव करत एक उंदीर महाराष्ट्रभर फिरतोय, अशी टीका केली.