महाराष्ट्र

आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 Aug :- पुणे सायबर पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्यानंतर अखेर अतुल भातखळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल भातखळकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संदीप भुजबळ यांनी अतुल भातखळकर यांच्याविरोधात पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. ट्वीटर अकाऊंटवरुन अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. भातखळकर यांनी केलेल्या ट्वीटनंतर त्यांच्यावर अनेक काँग्रेस नेत्यांनीही टीका केली होती. आता अतुल भातखळकर यांच्या पोलिसांकडून या पोस्टप्रकरणी चौकशीही केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.