बीड

न्युरोसर्जन डॉ.समीर शेख यांच्यामुळे रूग्णाला नवजीवन

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Aug :- बीड येथील काकु नाना हॉस्पीटलमधील न्युरोसर्जन डॉ.समीर शेख यांच्या अथक परिश्रमातुन एका रूग्णाला नवजीवन मिळाले आहे. याबद्दल रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉ.समीर शेख यांचे आभार मानले आहेत. दरम्यान डॉ.समीर शेख यांनी आत्तापर्यंत अनेक गंभीर आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केलेल्या आहेत.

बीड शहरातील काकु नाना मेमोरियल हॉस्पीटलमधील न्युरोसर्जन डॉ.समीर शेख यांनी एका रूग्णावर योग्य उपचार करून त्याला मृत्यूच्या दारातुन बाहेर काढले. डॉ.समीर शेख यांनी या पुर्वीही अनेक गंभीर आजार असलेल्या रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. औरंगाबाद, पुणे येथील डॉक्टरांप्रमाणेच डॉ.समीर शेख यांच्याकडून उपचार केले जातात. डॉ.समीर शेख यांची रूग्णसेवा सामान्य माणसाला नवजीवन मिळवून देत असल्याच्या भावना रूग्णाचे नातेवाईक व्यक्त करत आहे.

डॉ.समीर शेख यांनी एका रूग्णाचा जीव नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटूंब वाचवले काकु नाना हॉस्पीटलमधील डॉ.समीर शेख यांनी अथक व प्रामाणिक परिश्रमातुन सौरभ जोगदंड यास योग्य ते उपचार करून नवजीवन दिले आहे. डॉ.शेख यांनी एक जीव वाचवत असतांना त्यासोबत त्याचे संपूर्ण कुटूंब वाचवले आहे.

डॉ.शेख यांना इतर डॉक्टरांप्रमाणे मोठ्या शहरात जाता आले असते, खुप पैसे कमवता आले असते मात्र ते बीडच्या जनतेची गरज ओळखुन काकु नाना हॉस्पीटलमध्ये सेवा देत आहेत. हे माझ्यासह इतरांच्या मनातील वास्तव असल्याचे अ‍ॅड.बप्पा औटी यांनी सांगितले.