महाराष्ट्र

मद्य पिऊन महिलेचा बसमध्ये धिंगाणा; व्हिडिओ तुफान व्हायरल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Aug :- प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र याच बसमध्ये मध्य पिऊन प्रवास करणाऱ्या महिलेने धिंगाणा घातल्याने प्रवाशांचा एसटी कर्मचाऱ्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागला. हा प्रकार नुकताच नाशिक विभागात बसमध्ये घडला.

नाशिक विभागातून रोज सहाशेहून अधिक बसेस विविध मार्गावर धावत असतात नाशिक घोटी मार्गावर काल सायंकाळी धावणाऱ्या बसेसमध्ये एका महिलेने मद्य पिऊन चांगलाच गोंधळ घातला. अचानक या महिलेने गोंधळ घातल्याने प्रवाशांसह एसटी चालक व वाहकांमध्ये अडचणीचा सामना करावा लागला.

अनेक प्रवाशांनी सदर महिलेला आवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने कोणाचीही ऐकता गोंधळ घालण्यास सुरूच ठेवला. मात्र, महिलेच्या गोंधळ हा सुरू होता. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने एसटी कर्मचाऱ्यांनी ही एसटीच्या अधिकाऱ्यांना सह पोलिस अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.

याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी देखील तातडीने त्या ठिकाणी पोहोचत सदर महिलेला ताब्यात घेतले. मात्र मध्य सेवन केलेल्या या महिलेने पोलिस स्टेशनमध्ये देखील गोंधळ घातला होता. मध्य पिऊन सदर महिलांनी पोलिस कर्मचाऱ्यांना देखील अरेरावी केल्याचेही समोर आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत घोटी पोलिस ठाण्यात सदर महिले विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सदरची महिला बसमध्ये कुठून बसली तिच्यासोबत प्रवासी कोण होते याबाबतचे पोलिस अधिकाऱ्यांसह एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देखील चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान बसमध्ये गोंधळ घालणाऱ्या या महिलेच्या व्हिडिओ दिवसभर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला झाला आहे. विशेष म्हणजे श्रावण संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगू राहिली असून अनेक मिम्स देखील यावर तयार करण्यात आले आहे. सोशल मीडियावर शेअर देखील केले जात आहे.