बीड

खुशखबर!अंबेवडगाव येथील आज पाठवलेले २० स्वॅब निगेटिव्ह

धारूर तालुक्यातील २० जणांचे स्वॅब घेऊन ते लातुर येथील लॅबला तपासणीसाठी पाठवले होते.
धारूर तालुक्यातील अंबेवडगाव येथील एका व्यक्तीचा कोरोना पाॅझीटीव्ह रिपोर्ट आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती ,या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या कांही व्यक्तींचे स्वॅब धारूर तालुका आरोग्य विभागाने घेऊन तपासणीसाठी पाठवले होते. यात शनिवारी १४ जणांचे स्वॅब घेतले होते. त्यातील अंबेवडगाव येथील दोन महिलांचे रिपोर्ट पाॅझीटीव्ह आले होते . तर रविवारी २०जणांचे स्वॅब घेऊन ते लातुर येथील विलासराव देशमुख लॅबला तपासणीसाठी पाठवले होते. या रिपोर्टच्या निकालाची धारूर तालुक्यातील नागरिकांना प्रतिक्षा होती , या २० जणांचे रिपोर्ट आत्ता सायंकाळी आलेले असून २० पैकी २० स्वॅब निगेटिव्ह आलेले आहेत . अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ सचिन शेकडे यांनी दिली.