भारत

सोनाली हत्याकांडाप्रकरणी 4 जणांना अटक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 Aug :- हरियाणाच्या भाजप नेत्या व टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी गोवा पोलिसांनी शनिवारी कर्लीज क्लबचा मालक व एका ड्रग पॅडलरला अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सुधीर सांगवान व सुखविंदरसह एकूण 4 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कर्लीज क्लबच्या बाथरूममधून ड्रग्जही जप्त केले आहे. गोव्याचे आयजी ओमवीर बिश्नोई यांनी याची पुष्टी केली आहे. कोर्टाने सुखविंदर सिंह व सुधीर सांगवान याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दुसरीकडे, काँग्रेसने या प्रकरणी पोलिस व भाजपवर हल्ला चढवला आहे. गोवा काँग्रेसचे नेते मायकल लोबो यांनी पोलिसांवर सोनाली फोगाट हत्याकांड दाबण्याचा आरोप करत या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.पोलिसांनी चारही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयात हजर केले. त्यात कोर्टाने सुधीर सुखविंदर यांना 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस या सर्वांची एकमेकांपुढे बसवून चौकशीही करणार आहे. पोलिस अखेर या आरोपींची कुठे व कशी भेट झाली तथा त्यांना ड्रग्ज कसे मिळाले याचा तपास करणार आहेत.

गोव्याचे DGP जसपाल सिंह यांच्या माहितीनुसार, सुधीर व सुखविंदर यांनी 22 ऑगस्ट रोजी रात्री सोनालीला जबरदस्तीने ड्रग्ज दिल्याचे कबूल केले आहे. त्यांनी लिक्विडमध्ये मिसळून केमिकल दिले. पण ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे सोनालीची प्रकृती बिघडली. यामुळे त्यांची घाबरगुंडी उडाली. ते त्याच अवस्थेत तिला वॉशरूममध्ये घेऊन गेले. ते तिथे तिच्यासोबत तब्बल 2 तास होते.

हरियाणाच्या BJP नेत्या व टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी हिसारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची कन्या यशोधरा हिने आपल्या चुलत भावाच्या मदतीने त्यांना मुखाग्नि दिला. यावेळी ‘सोनाली अमर रहे’ व ‘सोनालीच्या खुन्यांना फाशी द्या’ अशा घोषणा देण्यात आल्या. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेले कुलदिप बिश्नोईही यावेळी सोनालीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले होते.