राहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदास नकार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
22 Aug :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाला नकार दिल्यानंतर आता भारत जोडो मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. या मोहिमेच्या तयारीसाठी त्यांनी सोमवारी दिल्लीच्या कॉन्सिट्यूशन क्लबमध्ये सिव्हिल सोसायटीचे सदस्य व काही प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. राहुल येत्या 7 तारखेपासून संपूर्ण देशात भारत जोडो यात्रा सुरू करणार आहेत.
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत चालणारी ही यात्रा तब्बल 150 दिवस चालेल. त्यात 3500 किमीचा प्रवास केला जाईल. यात्रेत राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व वेगवेगळ्या भागांतील नेत्यांचा समावेश असेल. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांच्या माहितीनुसार, या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस देशातील 12 राज्य व 2 केंद्रशासित प्रदेश कव्हर केले जातील.
उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यानी भारत जोडो यात्रा काढण्याची घोषणा केली होती. शिबिराच्या अखेरच्या दिवशी भाषणात राहुल म्हणाले होते – काँग्रेस पुन्हा जनतेत जाणार, त्यांच्यासोबतचे आपले नाते मजबूत करणार. हे काम शॉर्टकटने होणार नाही. यासाठी आम्ही मोठे कष्ट करू.
एप्रिलम महिन्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या एका बैठकीत निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला विविध सूचना केल्या होत्या. त्यात त्यांनी देशातील वेगवेगळ्या भागांतील जवळपास 200 प्रभावी व्यक्ती, कार्यकर्ते व सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांशी संवाद साधण्याचा सल्ला दिला होता.