आमदार मेटेंच्या अपघातानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
22 Aug :- राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर विधानसभेत निवेदन सादर करण्यात आलं.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांचा अपघात नेमका कसा घडला, याची सविस्तर माहिती सभागृहाला दिली. तसेच, याप्रकरणी पूर्ण कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही दिले. तसेच, सरकारने यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी सर्व आमदारांच्या वाहनचालकांसाठी नवे आदेश काढले आहेत.
त्यानुसार आता सर्व आमदारांच्या वाहनचालकांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यायची खबरदारी आणि रस्ते नियम यासाठी परिवहन विभागाकडून प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, सर्व आमदारांनी आपापल्या वाहनचालकांना प्रशिक्षणासाठी पाठवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. तसा प्रस्ताव आज विधानसभेत मांडण्यात आला, त्याला विरोधकांनीही पाठिंबा दिला. हे प्रशिक्षण २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे होणार आहे. सर्व आमदारांनी त्यांच्या वाहनचालकांना या प्रशिक्षणासाठी पाठवावे अशी सूचना अध्यक्षांनी दिली.