महाराष्ट्र

…तर ठाकरे सरकार वाचले असते- गुलाबराव पाटील

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Aug :- गुवाहटीला जाण्याआधी मी 20 आमदार घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो, तेव्हा तह केला असता तर आज ही वेळ आली नसती असा दावा शिंदेंगटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. आम्ही तेव्हाही शिवसेना वाचविण्याचा प्रयत्न केला आम्ही गद्दार नाही खुद्दार आहोत असा टोला आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

शिवसेनेत बंड झाल्याने दोन गट पडले आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी शिंदे सोबत गेलेल्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल करत आहे. शिंदे गटातील आमदारांवर आदित्य ठाकरे गद्दार असल्याची ठीका करत आहे. काल आदित्य ठाकरे जळगावात असताना त्यांनी गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

आम्ही शिवसेना वाचविण्यासाठी प्रयत्न केला तो त्यांना आवडला नाही, म्हणूनच ते आमच्यावर टीका करत आहेत, असे म्हणत गुलाबराव पाटील म्हणाले हे सरकार शिवसेना आणि भाजप युतीच सरकार आहे. याकडे त्यांनी त्याच दृष्टीने बघावे. असे सांगताना हे सरकार पडणार असा दावाही त्यांनी केला आहे.

कालच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी पत्रकार परिषदेत आमचे सर्व प्रवक्ते एक एका विषयावर बोलतील आम्ही असे म्हणाले होते यामुळे आता रोज नव्याने शिंदे गटातून थेट ठाकरेंवर टीका होण्याची शक्यता आहे.

मी सर्वप्रथम शिंदेंसोबत गेलो नाही, 32 आमदार तिकडे गेले तेव्हा मी 20 आमदारांसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र , तेव्हा शिवाजी महाराज जसा तह करत होते तसा तह उद्धव ठाकरेंनी केला असता तर आज ही वेळ आली नसती असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. आदित्य ठाकरे हे आता जसे दौरे करत आहेत तसेच दौरे करावे अशी आमची तेव्हा मागणी होती असेही गुलाबराव पाटलांनी म्हटले आहे. आमची त्यावेळची इच्छा अपेक्षा आदित्य ठाकरे आता पूर्ण करत आहेत त्यामुळे देव त्यांचं भलं करो. असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.