जेलमध्ये टाकणारे आमचे सरकार नाही, आम्ही हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करू- फडणवीस
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
21 Aug :- “आपले सरकार आल्यावर कसं खुलं खुलं वाटतय. दोन वर्षानंतर दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोउत्सव जोरात साजरा केले जाणार आहे. त्यानंतर दिवाळी, शिवजयंती, आंबेडकर जंयती सगळं काही जोरात साजरा केला जाणार आहे. हे आपले सरकार असून, कोणी हनुमान चालिसा म्हटल्यावर जेलमध्ये टाकणार नाही. उलट हनुमान चालिसा म्हणणाऱ्याचे सत्कार करणारे हे आमचे सरकार आहे.” अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व महाविकास आघाडीवर केली.
राणा दाम्पत्याकडून आज अमरावतीत दहीहंडीचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अभिनेता गोविंदा यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गोविंदाने अनेक गाण्यांवर ठेका धरला.
हनुमंताचा जयजयकार करणे या महाराष्ट्रात पाप झाले होते. त्यावेळी रवी आणि नवनीत राणा मैदानात आले. सरकारला त्यांनी चेतावणी दिली. मात्र त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले तरीही त्या हनुमान चालिसा म्हटल्याशिवाय राहणार नाही यावर ठाम होत्या. हनुमान चालिसा म्हणत-म्हणत त्या 14 दिवस जेलमध्ये राहिल्या. मला रवी आणि नवनीत राणा यांचे अभिमान असल्याचे फडणवीस म्हणाले.
पुढे फडणवीस म्हणाले की, “आज दहीहंडीच्या माध्यमातून आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. आज मी तुम्हाला सांगतो की, आपला विदर्भ जिल्हा असेल अमरावती असेल आता मागे वळून पाहायचे नाही, आता पुढे जात विकास करायचा आहे. ती दहीहंडी नाही विकासाची हंडी आहे. दहीहंडीतील मलाई प्रत्येकाला द्यायची असती, त्याचप्रमाणे आम्ही ती मलाई सर्वांना देऊ. अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली असून, यावेळी गोविंदाने “सोडी पे नखदे” गाण्यावर ठेका धरला.