News

स्टेट बँकेत शॉर्टसर्किटने आग

शिरुरच्या स्टेट बँकेत शॉर्टसर्किटने आग लागून लाखोंचे नुकसान

सायरन वाजल्याने मोठा अनर्थ टळला

शिरूर कासार (प्रतिनिधी) शहरातील स्टेट बँकेच्या शाखेत शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून संगणक संचासह महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले आहे.शनिवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान अचानक बँकेत शॉर्टसर्किट झाले होते. आग लागताच बॅंकेतील सायरन वाजल्याने तात्काळ शाखा व्यवस्थापक उमेश आडगावकर खाली आले कुलूप उघडले व बॅंक कर्मचारी बोलाऊन घेतले दरम्यान पोलीस दाखल झाले या सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून आग विझवण्यात यश मिळवले मात्र दरम्यानच्या काळात होणारे नुकसान होऊन गेले ,कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरच्या शाखा व्यवस्थापक राहत असल्याने घटनेची ताबडतोब माहिती झाली ,याकामी सायरन महत्वपुर्ण ठरले .आगीची तीव्रता मोठी असल्यामुळे या आगीत दोन कॅश काऊंटर,तीन संगणक संच,दोन प्रिंटर,दोन कॅश काऊंटिंग मशीन,एअर कंडिशनर,सहा सी.सी.टि.व्ही.कॅमेरे,तीन फॅन,बारा ट्यूबलाईट,वायरिंग,पीओपी असे मिळून जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पुढील तपास स.पो.नी.सुरेश खाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब नागरगोजे हे करत आहे .कामकाज किमान दोन दिवसांत पुर्ववत सुरू होईल असे शाखा व्यवस्थापक उमेश आडगांवकर यांनी सांगितले.वरीष्टांनीदेखील  भेट दिल्याचे सांगण्यात आले .