भारत

मुंबई, उत्तर भारत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? हल्ल्याच्या कटाचा खुलासा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 Aug :- हरिहरेश्वरला संशयित बोट आढळली आहे तर दुसरीकडे पाकिस्तानमधून मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी धमकीचा फोन आला आहे. या घटना ताज्या असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात लपून बसलेल्या दहशतवाद्याला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून मोठी माहिती समोर आली आहे.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट असल्याचं या तपासातून समोर आलं. यासाठी तयारीही सुरू केल्याची माहिती दहशतवादी जुनैद यांने दहशतवाद विरोधी पथकाला दिली. याची तयारी अकोल्यामध्ये सुरू होती.

जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन ट्रेनींग घ्यायची होती. मात्र कोरोना जाणं शक्य झालं नाही. त्यामुळे तो इथेच ट्रेनिंग घेत असल्याचा दावाही त्याने केला. इतर राज्यातल्या १०-१२ जणांनाही त्याने याच्या तयारीसाठी सोबत घेतलं होतं. नेमकं यांचा प्लॅन काय होता. ते १० ते १२ जण कोण आहेत आणि याबाबत अधिक तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून सुरू आहे. हरिहरेश्वरला संशयास्पद बोट सापडल्यानंतर महाराष्ट्रातही अलर्ट देण्यात आला आहे.

पोलीस प्रशासन यंत्रणा सतर्क आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि चेकिंग वाढवण्यात आलं आहे. हे सगळं असताना आता दहशतवादी हल्ल्याचा फोन पाकिस्तानमधून आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क असून या प्रकरणी देखील तपास करत आहे.