महाराष्ट्र

संतप्त महिलांनी अजित पवारांचा अडवला ताफा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 Aug :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज एक अनपेक्षित घटना घडली. मेळघाटातील कळमखार गावात संतप्त आदिवासी महिलांनी अजित पवारांचा ताफा रोखला. पावसाळ्याच्या दिवसात नालीचे पाणी घरात जात असल्याने त्यांनी रोष व्यक्त केला. यावेळी अजित पवारांनी महिलांची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला.

आदिवासी महिलांनी पावसाच्या दिवसात सांडपाणी घरात येत असल्याची तक्रार करत रोष व्यक्त केला. तसेच आदिवासी नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही, असं गऱ्हाणं त्यांनी अजित पवारांपुढे मांडलं. या प्रकरणी त्यांनी रोषात अजित पवारांना जाव विचारला. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

यावेळी अजित पवारांनी अतिशय संयमाने परिस्थि हाताळली. अजित पवार गाडीतून खाली उतरले. त्यांनी संतप्त महिलांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याचं आश्वासव पवारांनी आदिवासी महिलांना दिलं. पवारांच्या या आश्वासानाने आदिवासी महिला शांत झाल्या.

दरम्यान, अजित पवार हे मेळघाट दौऱ्यावर असल्याने प्रशासनाने दिखाव्यासाठी रस्त्यांची डागडुजी केलीय. मेळघाटात धारणी-परतवाडा रस्त्यावर जीवघेणे खड्डे आहेत. अजित पवार या रस्त्याने आज जाणार असल्याने चक्क मातीने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

अजित पवार यांची राज्यात धडाकेबाज नेता म्हणून ओळख आहे. पवार जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणतात आणि चांगल्या कामांचं कौतुक करतात. त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना त्यांच्या बेजबाबदार कामांवरुन फटकारलं आहे. त्यामुळे अजित पवारांकडे आदिवासी समाजाच्या आशा आहेत. महिलांच्या भावना समजून घेवून अजित पवार पावसाळी अधिवेशनात काहीतरी भूमिका मांडतील, अशी मेळघाटातील नागरिकांची आशा आहे.