बीड

बीड जिल्हा-आज 76 अहवालांची प्रतीक्षा

बीड – जिल्ह्यातून रुग्ण कोरोनमुक्त होऊन घरी रुग्ण जात असले तरीही रोज अनेक संशयीय व्यक्तींचे स्वॅब तपासणीकरिता पाठवण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यातून आज तब्ब्ल 76 स्वॅब तपासणीकरिता लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थ्येत पाठविण्यात आले आहेत त्यामुळे आज बीड जिल्ह्याला 76 स्वाब ची प्रतीक्षा आहे.
बीड जिल्हा रुग्णलयातून 6 स्वॅब, बीडच्या कोविड केअर सेंटर मधून 9 स्वॅब,अंबेजोगाई मधून 6 स्वॅब,कोविड केअर सेंटर अंबेजोगाई 25 स्वॅब,उप जिल्हा रुग्णालय केज मधून 20 स्वॅब, उप जिल्हा रुग्णालय परळी मधून 8 स्वॅब,ग्रामीण रुग्णालय आष्टी मधून 2 स्वॅब तपासणीकरिता पाठवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर. बी. पवार यांनी दिली.