महाराष्ट्र

थर कोसळून 12 गोविंदा जखमी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 Aug :- देशभरात गोपाळकालाचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचे वेगळे आकर्षण आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. दहीहंडी उत्सवादरम्यान ही दहीहंडी फोडताना थरांवरून कोसळून 12 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 जणांवर उपचार झाले आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 7 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

याशिवाय दादर इथे आयोजक आणि गोविंदा पथक यांच्या निष्काळजीपणामुळे एक रुग्णवाहिका अडकली होती. रुग्णवाहिका गोविंदा पथकाचे थर लागून खाली उतरेपर्यंत एका जागी होती उभी. मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बक्षीस मिळवण्यासाठी थरावर थर रचले जातात. त्यावरून कोसळून अनेक गोविंदा दरवर्षी जखमी होत असतात.

काहींना तर आपले प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच दिले होते. गोविंदांचा 10 लाखांचा विमाही काढण्यात आला आहे.