रायगड जिल्ह्यात आढळली संशयास्पद बोट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
18 Aug :- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एक संशयास्पद बोट आढळली असून या बोटीत तीन एके-४७ आढळल्या आहेत. तसेच काही कागदपत्रेही आढळून आली आहेत. सध्यातरी या बोटीचा दहशतवाद्यांशी काही संबंध दिसत नसला तरी राज्य सरकार हायअलर्टवर आहे. दरम्यान, या प्रकरणाचा महाराष्ट्र एटीएस करणार असून एटीएस प्रमुख विनित अग्रवाल यांनी घटनास्थळी दाखल होत बोटीची पाहणी केली आहे.
रायगड संशयित बोट प्रकरणाचा तपास एटीएस करणार असून एटीएस प्रमुख विनित अग्रवाल यांनी घटनास्थळी दाखल होत बोटीची पाहणी केली आहे. तसेच त्यांनी याबाबत स्थानिक पोलीस आणि नागरिकांशीही चर्चा केल्याची माहिती आहे. दरम्यान, या संदर्भात एटीएस प्रमुख विनित अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
”या प्रकरणाचा तपास सुरू असून आम्ही बोटीतून मिळालेली कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच आणखी काही वस्तू बोटीच्या आत आढळून आल्या आहेत. ही बोट आम्ही किनाऱ्यापासून बाहेर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.”
रायगडच्या किनाऱ्यावर सापडलेल्या बोटीत एके- ४७ सापडल्या असल्या तरी सध्यातरी याचा दहशतवाद्यांशी संबंध आढळून आलेला नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या बोटीचे नाव लेडीहान असून ती एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची आहे. हाना लॉडर्सगन असं या ऑस्ट्रेलियन नागरिकाचे नाव असून ती एक महिला आहे. तीचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान आहेत.
ही बोट मस्कटहून युरोपकडे जाणार होती. मात्र, बोटीचे इंजिन बिघडल्याने बोटीवरील सर्वांना रेस्क्यू करण्यात आले. तसेच समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नाही. त्यामुळे समुद्राच्या प्रवाहाने ती बोट रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आली, अशी माहिती देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.