बीड

नितीश कुमार यांनी 8व्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 Aug :- नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश यांनी हिंदीत देवाच्या नावाने शपथ घेतली. त्यानंतर लगेचच तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

तेजस्वींच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या मातोश्री राबडी देवीही राजभवनात पोहोचल्या. मात्र, तेजस्वींचे वडील आणि आरजेडी सुप्रीमो लालू यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. मात्र, शपथविधीपूर्वी नितीश यांनी लालूंशी फोनवर बोलून राजकीय परिस्थितीची माहिती दिली.

दरम्यान, महाआघाडीने विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन स्पीकरची निवडदेखील फ्लोअर टेस्टच्या वेळी होईल. महाआघाडीकडून RJD ला अध्यक्षपदाची खुर्ची मिळू शकते. मात्र, काँग्रेसनेही यावर दावा केला आहे.

मंगळवारी संध्याकाळी नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना 7 पक्षांच्या 164 आमदारांचे समर्थन पत्र सादर केले होते. नितीश यांच्यासोबत तेजस्वी यादवही राजभवनात उपस्थित होते. नितीश आणि तेजस्वी यांनी सरकार स्थापनेचा दावा मांडल्यानंतर राजभवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी तेजस्वी यांनी भाजपवर जोरदार बरसात केली. तेजस्वी म्हणाले होते- भाजपचा कोणताही मित्रपक्ष नाही, इतिहास दाखवतो की भाजप ज्या पक्षांशी संबंध ठेवतो त्यांना नष्ट करतो. पंजाब आणि महाराष्ट्रात काय झाले ते आपण पाहिले.