…तर यापुढे कायदेशीर नोटीस पाठवेल! संजय राठोडांचा चित्रा वाघ यांना इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
10 Aug :- मी निष्कलंक आहे, म्हणताना मंत्री संजय राठोड यांची जीभ घसरल्याचे दिसून आले. यावेळी लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांना काही माहिती नसेल तर त्यांना सर्व माहिती देईल मात्र कागदपत्रे पाठवून जर असे आरोप झाले तर यापुढे कायदेशीर नोटीस पाठवणार असा इशारा मंत्री संजय राठोड यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.
कागदपत्र पाहून मला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. माझ्याविरोधात गुन्हा दाखल नाही,तरीही माझ्यावर आरोप करण्यात आले. मात्र, मी मंत्रिपदावर असल्यास तपासात प्रेशर येऊ नये यासाठी मी स्वत:हून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंनी कागदपत्रे पाहिली आणि मगच मी मंत्रिपदाची शपथ घेतली, असे मंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे.
माझा त्या प्रकरणात कुठेही संबंध असल्याचे दिसून आलेले नाही. पोलिसांवर आणि न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास होता, म्हणून मी आतापर्यंत शांत होतो असेही संजय राठोड यांनी सांगितले आहे. मी 4 वेळा आमदार झालो आहे. माझ्यामतदारसंघात काही चांगली कामे करत असेल म्हणूनच लोकांनी मला निवडून दिले असेल असे सांगतानाच आगामी काळात राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
15 महिन्यांच्या तपासाअंती मला पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. माझे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र, पोलिसांनी मला क्लीन चीट दिल्याचे राजपत्र प्रकाशित केले आहे. मी निष्कलंक आहे असा दावा मंत्री संजय राठोड यांनी केला आहे. माझयावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी दोनदा प्रटिशन दाखल करण्यात आले. मात्र, कोर्टाने मला न्याय दिला असे राठोड म्हणाले