महाराष्ट्र

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 Aug :- अखेर 34 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या विस्तारावर आक्षेप नोंदवला आहे. आज एकूण 18 आमदारांचा शपथविधी पार पडला. पुढील महिन्यात होणाऱ्या विस्तारात अनेकांना संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं जात आहे.

दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यांनी ट्विट करुन आपली भावना व्यक्त केली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी न मिळाल्याने पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी वेळोवेळी विविध प्रकार आपली नाराजी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वाढदिवशी लावलेल्या फ्लेक्सवर कोणत्याही भाजप नेत्याचं नाव नव्हतं. यापूर्वीही पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार मानलं जात होतं. मात्र पक्षाकडून त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीत संधी देण्यात आली नाही. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी नव्या मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.