महाराष्ट्र

चित्रा वाघ संतापल्या…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 Aug :- भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया देताना संजय राठोड यांच्या मंत्रिपदावरून टीका केली आहे. एका तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या संजय राठोडला मंत्रिपद देणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ यांनी ट्वीट करून म्हटले की, पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. लडेंगे… जितेंगे!”

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते तथा माजी मंत्री संजय दुलीचंद राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदार संघाचे विधानसभेत नेतृत्व करतात. त्यांच्याकडे महाराष्ट्राचे वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचा कार्यभार होता. ते यवतमाळचे पालकमंत्रीही होते. पण पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

संजय राठोड हे बंजारा समाजाचे दिग्गज नेते आहेत. त्यांचा राजकीय प्रवास एका सामान्य कुटुंबापासून झाला. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर एका सर्वसामान्य शिवसैनिकपासून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल मारली. यवतमाळ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण राठोडांनी याठिकाणी शिवसेनेच्या संघटनेची मजबूत बांधणी केली. त्यांची शिवसेनेचे जिल्हाध्यक्षपदही सांभाळले.

पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागल्यानंतर ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नाराज होते. यामुळे एकनाथ शिंदेंनी बंड पुकारताच ते त्यांच्या गटात सामील झाले. आणि आता शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली.