मुंबईतील रुग्णालयाचा निष्काळजीपणा! 500 जणांचे जीव धोक्यात
मुंबई, 7 जून : राज्यात मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. आतापर्यंत देशात कोरोनाची 2.46 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोरोनाद्वारे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रात वेगाने वाढणार्या कोरोना-संक्रमित रूग्णांसोबत बर्याच वेळा निष्काळजीपणा घ़डल्याच्या घटना समोर येत आहे. ज्यामुळे लोकांचे जीव टांगणीला लागत आहे.
मुंबईतील वसई परिसरातील एका खासगी रुग्णालयातही अशीच निष्काळजीपणाची घटना समोर आली असून कोरोना तपासणीच्या अहवालाची वाट न पाहता रुग्णाचा मृतदेह त्याच्या कुटूंबाकडे सोपविला. यानंतर शेकडो लोकांच्या उपस्थितीत कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. नंतर, रुग्णालयात आलेल्या अहवालात मृताला कोरोना विषाणूची लागण झाल्याची बाब समोर आली.

कोरोनाच्या वृत्ताची बातमी समजताच मृतांच्या कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाला याची माहिती होताच मृतांच्या 40 कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाईन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. मृतांच्या अंत्यसंस्कारात 500 हून अधिक लोक उपस्थित होते. या सर्व लोकांमध्ये आता कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. कोरोना अहवालाची वाट न पाहता त्यांनी मृतदेह त्यांच्या स्वाधीन का केला, शिवाय रुग्णालयाने दुर्लक्ष केल्याचा आरोप परिवाराने केला आहे. यकृत निकामी झाल्यामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला होता.