महाराष्ट्र

संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Aug :- एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलैला मध्यरात्री अटक केली. त्यांना आज तिसऱ्यांदा पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना कोर्टाने दिलासा दिला, त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात येणार आहे. 22 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली आहे.

ईडी कोठडीदरम्यान काय झाले?
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांची ईडीकडे चौकशी करण्यात आली.
वर्षा राऊत यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी
राऊतांच्या पत्नीकडून अनोळखी व्यक्तीकडून पैसे मिळाले. त्यामुळे वर्षा राऊत यांच्या सर्व खात्यांची चौकशी केली गेली.
वर्षा राऊत यांच्या खात्यात कोट्यावधींचे ट्रान्झेक्शन झाले त्याचे धागेदोरेही ईडीकडून तपासणी
ईडी तिसऱ्यांदा कोठडी मागणार

गेल्या चार दिवसांत ईडीने संजय राऊतांची चौकशी झाली. त्यादरम्यानईडीला अनेक गोष्टी पुढे आल्या. त्यामुळे ईडीने आता राऊतांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी ईडी न्यायालयात करणार आहे. तिसऱ्यांदा राऊत यांना ईडीचे अधिकारी कोठडी न्यायालयाकडे मागणार आहेत.