संभाजीराजे छत्रपती संतापले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल (Aurangzeb) केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता उमटायला सुरूवात झाली आहे. औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे,तर देशात राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
अबू आझमी महाराष्ट्रात का राहतायत? अशा व्यक्तीला पहिले महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे. त्यांची अशी बोलण्याची हिंमत होतेच कशी? असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबाचा खरा इतिहास जनतेसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात आहे, असं अबू आझमी म्हणाले होते.