महाराष्ट्र

फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 Aug :- राज्यात सत्तांतर होऊन महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी उलटला असला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेले नाही. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. हे अवघ्या देशाला माहीत असून, मात्र सर्च इंजिन गुगलला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे अद्याप माहिती नाही. आता तुम्ही म्हणत असाल हे कसे शक्य आहे. तर तुमच्या मनात आलेला प्रश्न शंभर टक्के खरा आहे. मात्र, गुगलवर तुम्ही ‘देवेंद्र फडणवीस’ असे सर्च केले असता गुगल रिझल्टवर फडणवीस हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचे दाखवण्यात येत आहे. गुगलकडून काहीतरी चूक झाल्याने हा प्रकार घडला असावा. या चुकीची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मात्र, असे असतानाही राज्यात अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्लीवारी वारंवार सुरू आहे. सध्या देखील शिंदे आणि फडणवीस हे दोघे दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत.

फडणवीसांनी 30 जूनला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून अडीच वर्षे काम केले आहे. ठाकरे सरकारला त्यांनी अनेक मुद्द्यांवरून त्यांनी घेरले होते. विरोधी पक्षनेते होण्यापूर्वी फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 या कालावधीत फडणवीसांनी महाराष्ट्राचे नेतृत्त्व केले.