बीड

राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार गप्प का? वाचा, काय म्हणाले भुजबळ…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 Aug :- पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत न्यायालयाने आणखी वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांना आता ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत राहावं लागणार आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, राऊतांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सार्वजनिक प्रतिक्रिया आलेली नाही.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळांना संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार गप्प का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते गुरुवारी (४ ऑगस्ट) नाशिकमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “असं काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुप्रिया सुळेंनी लोकसभेत ईडीच्या कारवाईवर चर्चा घडवून आणली आहे. त्यात त्यांनी काही गोष्टी मांडल्या. ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. त्याविषयी देखील त्या बोलल्या. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षांसोबत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते भाष्य करत आहेत.”