महाराष्ट्र

राऊतांना धक्का! घोटाळा प्रकरणी पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 Aug :- ईडी कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही सक्तवसुली संचालनालयाने (ED) चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीने वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केलाय. आता या प्रकरणात ईडी वर्षा राऊतांची चौकशी करणार आहे.

पत्राचाळ गैरव्यवहार असो की अलिबागमधील जमिनीचे व्यवहार असो हे सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत, असा आरोप ईडीने केलाय. ईडीने याबाबत सेशन्स कोर्टातही याबाबत कागदपत्रं सादर केली. आता वर्षा राऊत यांच्या खात्यावर अनोळखी लोकांकडून आलेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे. त्यामुळे लवकरच वर्षा राऊत यांनाही ईडी कार्यालयात येऊन चौकशीला सामोरं जावं लागेल.

दरम्यान, वर्षा राऊत यांची आधीही ४ जानेवारीला ईडीने चौकशी केली होती. ती चौकशी पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली होती. ईडीच्या नोटीशीनंतर राऊत यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती.