महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदेंची प्रकृती बिघडली; फडणवीस दिल्लीला रवाना

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 Aug :- सततच्या दौ-यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली. यामुळे सर्व प्रशासकीय बैठका आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत. राज्यात सुरू असलेले पाहणी दौरे आणि बैठका यामुळे त्यांना थकवा जाणवत असून डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक दौरे आणि बैठका घेतल्या आहेत. त्याचबरोबर पहाटेपर्यंतच्या सभा, पूरग्रस्त भागाची पाहणी आणि प्रवास या सर्वामुळे त्यांना थकवा आणि दगदग त्यांची झाली. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना आरामाचा सल्ला देण्यात आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. यामागे ठोस कारण स्पष्ट नाही परंतु, त्यांचे राज्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीसंदर्भात ते दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करतील अशी शक्यता आहे.

यासह मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला आणि बंडखोर आमदार अपात्र ठरले तर भाजपासमोर काय पर्याय आहेत यासंदर्भात देवेंद्र फडणवीस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करु शकतात अथवा ती रणनितीही ठरवली जाऊ शकते. विशेषतः मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्तही अजून झालेला नाही त्याची तारीखही बैठकीत निश्चित होऊ शकेल.