महाराष्ट्र

‘या’ तारखेला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 Aug :- शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, महिना उलटला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाले नाही. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल रोज विरोधकांकडून विचारण्यात येत आहे. यातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात 5 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 मंत्री शपथ घेऊ शकतात. भाजप गटातील 8 आणि एकनाथ शिंदे गटातील 7 मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे सरकारला एक महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाला, मात्र सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्व कामकाज पाहत आहेत. दोघे जण सर्व कारभार पाहत असल्याने एक दुजे के लिए असाच यांचा कार्यक्रम दोघांचा चाललेला आहे, अशी ही टीका विरोधकांनी केली आहे.

शिंदे यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिंदे सरकारने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे 751 सरकारी आदेश जारी केले असून त्यापैकी 100 हून अधिक आदेश हे एकट्या आरोग्य विभागाशी संबंधित आहेत.