राऊतांसाठी गांधी मैदानात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
2 Aug :- घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. त्यानंतर कोट्राने त्यांना 4 आठवड्यांपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. त्याचे संसदेतही तीव्र पडसाद उमटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी सगळे दिवस सारखेच नसतात असे नमूद करत भाजप व केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. त्यानंतर आता थेट काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी राऊतांच्या समर्थनार्थ ट्विट करून त्यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.
राहुल गांधी यांनी सोमवारी रात्री संजय राऊतांना ईडीने अटक केल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट ट्विट भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले – ‘राजाचा संदेश स्पष्ट आहे – जो माझ्याविरोधात बोलेल, त्याला अडचणींचा सामना करावा लागेल. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मनोधैर्याचे खच्चीकरण करणे व सत्याचे तोंड बंद करण्याचे कसोशिने प्रयत्न होत आहेत. पण हुकूमशहाने ऐकावे, शेवटी ‘सत्या’चाच विजय होऊन अहंकाराचा पराभव होतो.’
संजय राऊत यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. यामुळे त्यांनी बलाढ्य भाजपचा रोष ओढवून घेतला होता. आपल्याला आज न उद्या एखाद्या प्रकरणात अटक केली जाईल याची त्यांना माहिती होती. ही शक्यता त्यांनी काही प्रसंगात पत्रकारांना बोलूनही दाखवली होती. त्यानुसार आज ते गजाआड झालेत.
रत्नागिरीतील दापोली येथील सेना नेते अनिल परबांचा साई रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून बांधल्याचा आरोप आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले. पण महाविकास आघाडीच्या सरकारमुळे त्यावरील कारवाई आतापर्यंत टळळी. त्यानंतर या रिसॉर्टच्या व्यवहारात मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप करत ईडीने परबांना 4 वेळा समन्स बजावला. पण परबांनी ईडीपुढे जाणे टाळले. त्यानंतर ईडीने त्यांच्या निवासस्थानी धाड टाकली. आता राऊतांच्या अटकेनंतर त्यांच्याभोवती कारवाईचा फास आवळला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.