News

धारूर तालुक्यातील अंबेवडगाव येथील तीन जण कोरोना पाॅझीटीव्ह: आरोग्य विभागाच्या तीन टीम अंबेवडगावात दाखल – डाॅ. शेकडे


तेलगाव, दि. (बालाप्रसाद जाजु) – धारूर तालुक्यातील अंबेवडगाव येथील एका व्यक्तीचा कोरोना पाॅझीटीव्ह रिपोर्ट आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर कांही व्यक्तींचे स्वॅब धारूर तालुका आरोग्य विभागाने घेऊन तपासणीसाठी पाठवले. त्यातील कांहींचे रिपोर्ट शनिवारी सायंकाळी आले असुन, यात दोन महिलांचे रिपोर्ट पाॅझीटीव्ह आले आहेत.तर दोन रिपोर्ट अनिर्णित आहेत. त्यामुळे आता अंबेवडगाव येथील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या तीन झाली असुन, या तीनही रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अंबेवडगाव येथे तीन कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण झाल्याने धारूर तालुका आरोग्य विभागाने याची गंभीरतेने दखल घेऊन अंबेवडगाव येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ पवार व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ सचिन शेकडे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ.मुंडे व इतर आरोग्य कर्मचारी यांचा समावेश असलेल्या आरोग्य विभागाच्या तीन टीम दाखल करून, या टीमच्या माध्यमातुन गावात जनजागृती करून, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.तर याच व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या आणखी २०जणांचे स्वॅब घेऊन ते रविवारी लातुर येथे तपासणीसाठी पाठवले असल्याचे ही डाॅ. सचिन शेकडे यांनी सांगुन, या स्वॅबचे रिपोर्ट रविवारी सायंकाळ पर्यंत येण्याची शक्यता असल्याचे शेकडे यांनी सांगितले. संपुर्ण धारूर तालुक्यातील जनतेचे २० जणांच्या रिपोर्टकडे लक्ष लागले आहे.