क्रीडा

आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा! ‘या’ दिवशी भारत-पाकिस्तान महामुकाबला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Aug :- आशिया कप 2022 च्या Asia Cup 2022 वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरूवात होईल, तर 11 सप्टेंबरला आशिया कपची फायनल खेळवली जाईल. यावेळचा आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने यंदाचा आशिया कप टीम इंडियासह इतर देशांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

27 ऑगस्टला श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या सामन्याने आशिया कपला सुरूवात होईल, तर 28 ऑगस्टला रविवारी भारत आणि पाकिस्तान India vs Pakistan यांच्यात दुबईमध्ये महामुकाबला होईल. मागच्या वर्षी याच मैदानात दोन्ही देशांमध्ये टी-20 वर्ल्ड कपची मॅच झाली होती, या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.

याआधी 2018 साली आशिया कप खेळवला गेला होता, तेव्हा फायनलमध्ये भारताचा विजय झाला होता. यंदाच्या स्पर्धेत एकूण 9 टीम सहभागी होणार आहेत. यातल्या युएई, कुवैत, सिंगापूर आणि हाँगकाँग क्वालिफायिंग राऊंड खेळतील, यातला विजेता भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध मुख्य स्पर्धेत खेळेल. यंदाचा आशिया कप श्रीलंकेमध्ये होणार होता, पण तिथल्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळे ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्य स्पर्धेमध्ये 6 टीमची दोन ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर ग्रुप एमध्ये तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ग्रुप बीमध्ये आहेत. ग्रुपमधली प्रत्येक टीम दुसऱ्या टीमविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल.

दोन्ही ग्रुपमधल्या टॉप 2 टीम सुपर-4 स्टेजसाठी क्वालिफाय होतील. या 4 टीम एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. सुपर-4 ग्रुपच्या सगळ्या मॅच झाल्यानंतर टॉप-2 टीम फायनलमध्ये खेळतील. आशिया कपच्या या फॉरमॅटमुळे भारत-पाकिस्तान यांच्यात कमीत कमी 2 तर जास्तीत जास्त 3 मॅच होण्याची शक्यता आहे.

28 ऑगस्टच्या सामन्यानंतर भारत आणि पाकिस्तानचा क्वालिफायर स्टेजमधून येणाऱ्या टीमविरुद्धचा विजय निश्चित मानला जात आहे, त्यामुळे दोन्ही टीम सुपर-4 स्टेजमध्ये क्वालिफाय करतील. सुपर-4 मध्येही पुन्हा एकदा या दोन्ही टीमचा सामना होईल. जर या दोन्ही टीम सुपर-4 स्टेजमध्येही टॉप-2 मध्ये राहिल्या तर फायनलमध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना रंगेल.

आशिया कपचं वेळापत्रक
ग्रुप ए :

भारत विरुद्ध पाकिस्तान : 28 ऑगस्ट, दुबई
भारत विरुद्ध क्वालिफायर : 31 ऑगस्ट, दुबई
पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर : 2 सप्टेंबर, शारजाह
ग्रुप बी
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान : 27 ऑगस्ट, दुबई
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान : 30 ऑगस्ट, शारजाह
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश : 1 सप्टेंबर, दुबई
सुपर-4
B1 v B2: 3 सप्टेंबर, शारजाह
A1 v A2: 4 सप्टेंबर, दुबई
A1 v B1: 6 सप्टेंबर, दुबई
A2 v B2: 7 सप्टेंबर, दुबई
A1 v B2: 8 सप्टेंबर, दुबई
B1 v A2: 9 सप्टेंबर, दुबई
फायनल : 11 सप्टेंबर, दुबई