महाराष्ट्र

दिल्लीत रंगणार ओबीसी मेळावा; पवार, सीएम शिंदे, फडणवीस एकाच मंचावर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Aug :- दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिल्लीत या ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्ता नाट्यांतरानंतर मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच शरद पवार यांची भेट घेतील. त्यामुळे या मेळाव्यात कशाप्रकारचा सामना रंगतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नुकतेच सुप्रिम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका जाहीर केल्या होत्या, त्या ओबीसी आरक्षणाशिवायच घेण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून ओबीसी आरक्षणावर खलबते सुरु आहेत. मात्र न्यायालयाने निवडणुका जाहीर केलेल्या रचनेप्रमाणेच घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील या कार्यक्रमाला वीस हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या नेत्यांचीही उपस्थितीदिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये मेळावा होणार आहे. शरद पवार यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होईल. तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. यासोबतच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, रामदास तडस, बाळूभाऊ धानोरकर, महादेव जानकर, हंसराज अहीर, जयदत्त क्षीरसागर, फिरोदस मिर्झा, संजय कुटे, आमदार परिणय फुके, अभिजीत वंजारी या नेत्यांची देखील उपस्थिती राहणार आहे.

स्वतंत्र ओबीसी मंत्रालय द्या

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबन तायवाडे यांनी याबाबत माहिती दिली. या मेळाव्यात विशेत: जातीनिहाय जनगणना, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, देशभरात ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षण या मागण्या करण्यात येणार आहेत. मात्र ओबींसींच्या प्रश्नांपेक्षा शरद पवार, फडणवीस-शिंदे यांच्या एकाच मंचावर असण्याची चर्चा रंगली आहे.